माहीत आहे का तुम्हाला? #१७


* आशियातील सर्वात मोठे कृषी विश्वविद्यालय हिस्सार येथे आहे.

* धर्म गर्डियन हा युद्ध सराव भारत - जपान या दोन देशांत पार पडला आहे.

* एक्साम वॉरियर्स हे पुस्तक नरेंद्र मोदी यांनी लिहिले आहे.

* ऑस्कर साठी नामांकित होणारा पहिला मुस्लिम अभिनेता: रिझ अहमद

* अरुंधती योजना आसाम राज्याने सुरू केली आहे, या योजनेत सर्व समुदायातील नववधूला विवाहावेळी एक तोळे सोने मोफत देण्याची ही योजना आहे.

*आंध्र प्रदेश राज्याने राज्यातील उद्योगांमध्ये स्थानिकांना नोकऱ्यांमध्ये ७५% आरक्षण दिले आहे, असे आरक्षण देणारे हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.

* भारतात २०१८ मध्ये पहिले विशेष गोल पोस्टल तिकीट महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती निमित्त जारी करण्यात आले होते.

* छतीसगढ हे राज्य ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दिव्यांगांना आरक्षण देणारे पहिले राज्य ठरले आहे.

* अरुणाचल प्रदेशात ३५% ग्रॅफाईट चे साठे आढळून आले आहेत 

*Relentless हे यशवंत सिन्हा यांचे आत्मचरित्र आहे.

* बेघर कुटुंबांची संख्या शून्यावर आणण्याची सर्वप्रथम कामगिरी: लक्षद्वीप

संकलन: Truptesh Bhadane