भूविज्ञानदृष्ट्या भारताचे सर्वसाधारण तीन भाग पडतात.

1) हिमालय पर्वतरांगा 2) गंगेचे मैदान 3) द्विपकल्पीय पठार

• सुरुवातीच्या काळात, सर्व भूप्रदेशाचे एकच वैश्विक महाखंड होते त्याला पँजिया या नावाने ओळखले जात होते. हा महाखंड टेथीस या समुद्रामुळे वेगळा होऊन याचे दोन भाग पडले.


• पन्जिया (एकच महाखंड)

टेथिस समुद्रामुळे याचे दोन भाग

• याच प्रक्रियेदरम्यान गोंडवन भागापासून अलग झालेल्या इंडो ऑस्ट्रेलियन भूपट्टा आणि युरेशिया यांची टक्कर होऊन टेथीस सागराच्या तळाशी तयार झालेले गाळाचे खडकांमुळे हिमालय पर्वताची निर्मिती झाली.
• द्विपकल्पीय पठार हा पृथ्वीवरील सर्वात प्राचीन आणि सर्वात स्थिर असा भूभाग असून या पठारावर मुख्यतः अग्निजन्य आणि रुपांतरीत खडकांचे आवरण आहे.
• पठारावरील सर्वात जुने पट्टीताश्म (Gneisses) आणि कणाश्म (Granites) खडक अरवली पर्वतरांगात सापडतात.
• प्रदेश समान वैशिष्ट्यांच्या आधारे निश्चित केले जातात. सलगता आणि समानता ही त्यांची वैशिष्ट्ये असून एखाद्या क्षेत्राला अनेक छोट्या विभागामध्ये विभागण्याच्या प्रक्रियेला प्रादेशिकीकरण म्हणतात. जसे देशाची विभागणी राज्यांमध्ये, राज्यांची जिल्ह्यांमध्ये इ.
• प्रादेशिकीकरण अत्यंत आवश्यक आहे कारण प्रदेश हा आर्थिक विकासाचा पाया असून ऐतिहासिक, राजकीय आणि सामाजिक विश्लेषणासाठी महत्त्वाचा असतो.
• विविध समस्या सोडवण्यासाठी छोटे प्रदेश असणे आवश्यक असते आणि या प्रदेशाच्या विकासामागे मनुष्य ही प्रेरणाशक्ती असते.
• भारताचे याप्रकारे साम्यता दाखवणारे पाच प्रदेश आहेत त्यांना प्राकृतिक किंवा नैसर्गिक विभाग म्हणतात. ते याप्रमाणे आहेत.

1) उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश 2) उत्तर भारतीय मैदाने 3) भारतीय पठार 4) किनारी मैदानी प्रदेश 5) बेटे