रोग :-
शारीरिक किंवा मानसिक कार्यात बिघाड निर्माण होण्याच्या स्थितीला रोग म्हणतात. निरोगी राहणे हे प्रत्येकासाठी महत्त्वाचे असते. परंतु बऱ्याच वेळा आहारातील समस्या, वातावरणातील बदल यामुळे रोग निर्माण होतात. जसे...
1) साथीचे रोग :- ठराविक क्षेत्रात राहणाऱ्या लोकांना जेव्हा एकच आजार होतो तेव्हा त्याला साथीचा रोग असे म्हणतात. हिवताप, टायफाईड, कावीळ आणि कॉलरा हे साथीच्या रोगांची उदाहरणे आहेत.
2) संसर्गजन्य रोग :- एकमेकांच्या संपर्कात येऊन संसर्ग होणाऱ्या रोगांना संसर्गजन्य रोग असे म्हणतात.
उदाहरणार्थ क्षयरोग, घटसर्प इत्यादी.
3) संपर्कजन्य रोग :- संपर्क म्हणजे स्पर्श, स्पर्शावाटे होणाऱ्या रोगांना संपर्कजन्य रोग असे म्हणतात.
उदाहरणार्थ खरुज, नायटा इत्यादी.
• हिवताप (Maleria) हा आजार अन्नाफिलस डासाची मादी चावल्याने होत असून याचा रक्ताभिसरण संस्थेवर परिणाम होतो. खूप थंडी वाजणे, ताप येणे, डोके दुखणे, सांधेदुखी, रक्तक्षय, इत्यादी या रोगाची लक्षणे आहेत. हिवताप तीन अवस्थांमध्ये असतो. 1) शीत अवस्था 2) उष्ण अवस्था, 3) घाम अवस्था.
आपल्याला रोग होऊ नये यासाठी योजल्या जाणाऱ्या उपायांना रोग प्रतिबंधात्मक उपाय असे म्हणतात. पाणी शुद्ध करण्यासाठी ब्लिचिंग पावडरचा वापर केला जातो. तर बाजारातील खाद्यपदार्थ झाकून
ठेवणे कायद्याने सक्ती केली असून हे प्रतिबंधात्मक उपाय आहेत.
• यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरूंना कॉलरा रोग होण्याची शक्यता असते कारण हा रोग दूषित अन्नपाण्यामुळे पसरत असतो म्हणून यात्रेला जाण्यापूर्वी कॉलरा प्रतिबंधक लस टोचली जाते. तर 'हिपॅटायटीस बी' हा काविळीचा प्रकार टाळण्यासाठी सुद्धा लस टोचली जाते.
• बी. सी. जी. (BCG) त्रिगुणी लस (Bacillus Calmette Guerin) ही घटसर्प, डांग्या खोकला आणि धनुर्वात यांच्या प्रतिबंधासाठी दिली जाते. ही लस मुख्यत्वेकरून क्षय रोगाविरुद्ध वापरली जाते.
• प्रथमोपचार अपघातानंतर जखमींना वैद्यकीय मदतीची गरज असते. वैद्यकीय मदत मिळेपर्यंत करण्याच्या तात्पुरत्या उपचारांना प्रथमोपचार असे म्हणतात.
• इजा झालेल्या ठिकाणी असह्य वेदना होऊन त्या भागाचा आकार सूज येऊन लक्षात येण्याजोगा बदलणे ही हाड मोडल्याची लक्षणे आहेत.
• पोळणे म्हणजे अतिगरम वाफेमुळे बसणारा चटका यामुळे त्वचा लाल होते तर भाजणे म्हणजे आगीमुळे किंवा तीव्र रसायनांमुळे होणारी जखम होय.
उष्माघात:-
• प्रखर सूर्यप्रकाशात किंवा उन्हात बराच वेळ फिरल्यामुळे भोवळ येणे, उलट्या होणे, डोके दुखणे, श्वासोच्छ्वासात अडथळा येणे या स्थितीला उष्माघात असे म्हणतात. ज्या ठिकाणी उन्हाळ्यात तापमान 45 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असते, अशा ठिकाणी उष्माघाताचे प्रकार अधिक आढळतात. यावेळी ज्याला उष्माघात झाला त्याला सावलीत बसवून जलसंजीवनी पिण्यास देतात.
जलसंजीवनी :- ओरल रिहायड्रेशन सोल्युशन (ओ.आर.एस.) :-
• याचा उपयोग शरीरातील पाणी आणि क्षार यांची कमतरता भरून काढण्यासाठी होतो.
• हगवण आणि डीहायड्रेशन (निर्जलीभवन) झालेल्या रुग्णांसाठी वापरतात.
• तीव्र भाजलेल्या रुग्णांनाही देतात.
जलसंजीवनी तयार करण्याची पद्धत
• उकळून थंड केलेले एक लिटर पाणी घ्या.
• त्यामध्ये शिगोशिग भरलेली चहाचे आठ चमचे साखर आणि अर्धा चमचा नेहमीच्या वापरातले मीठ घाला. चव येण्यासाठी लिंबाच्या रसाचे थेंब घाला.
• मिश्रण चांगले ढवळा आणि हे मिश्रण थोड्या थोड्या वेळाने पिण्यास द्या.
• सर्पदंश झाल्यास दंश झालेल्या जागेच्या वर आवळपट्टी बांधून पोटॅशियम परमॅग्नेटच्या (KMnO.) द्रावणाने जखम धुतात व त्याचे स्फटिक जखमेवर दाबुन बसवतात.
• अन्न, वस्त्र व निवारा या मानवाच्या मुलभूत गरजा आहेत.
• पृथ्वीवरील माती, दगड, खनिजे, हवा, पाणी, वनस्पती, प्राणी इत्यादी नैसर्गिक साधन संपत्ती आहे.
• शेतीसाठी सुपीक मृदेची आवश्यकता असते तर भांडी, माठ, रांजण तयार करण्यासाठी मातीचाच उपयोग केला जातो. चिनी मातीपासून कपबशा, बरण्या, मुखवटे, कुंड्या अशा उपयोगी तसेच शोभेच्या वस्तू बनवल्या जातात. मुलतानी माती सौंदर्य प्रसाधन म्हणून वापरली जाते.
• शहाबादी फरशी तसेच संगमरवर, कडप्पा अशा दगडांचा वेगवेगळ्या बांधकामात उपयोग केला जातो.
• धातूपाषण (Ores) म्हणजे धातूचा असा कोणताही भाग की जो आर्थिक दृष्ट्या महत्त्वाचा असून अशुद्ध स्वरूपात आढळतो. सहसा खाणीमध्ये धातूपाषाण आढळत असून उष्णतेच्या आधारे गाळण प्रक्रियेने (Smelting) यातील अशुद्धी बाहेर काढली जाते. उदाहरणार्थ डोलोमाईट, क्रोमाइट, मॅग्रेटाइट इत्यादी
• यापासून मिळणाऱ्या शुद्ध धातूंचा उपयोग कारखान्यांमध्ये केला जातो. आणि हत्यारे. यंत्रे व घरामध्ये वापरली जाणारी भांडी इत्यादी बनवली जातात.
• सजीवांना श्वसनासाठी हवा लागते. पृथ्वीभोवती हवेचे आवरण असून त्यामुळेच पृथ्वीवर सजीवसृष्टी आढळते. हवा ही सुद्धा एक नैसर्गिक साधन संपत्ती आहे.
• आपल्या अन्नातील बहुतांशी पदार्थ वनस्पतींपासून मिळत असून अन्नासाठी काही प्राणी वनस्पतींचा उपयोग करतात त्यांना शाकाहारी म्हटले जाते. तर काही प्राणी अन्नासाठी इतर प्राण्यांवर अवलंबून असतात त्यांना मांसाहारी (Carnivorus) प्राणी असे म्हणतात. मांसाहारी प्राणी साहसी आणि सक्रिय असतात परंतु हे प्राणी अन्नासाठी अप्रत्यक्षपणे वनस्पतींवर अवलंबून असतात.
• नैसर्गिक साधन संपत्तीची जपणूक करणे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. आपला परिसर स्वच्छ ठेवणे, प्राण्यांची बेछूट हत्या थांबवणे, त्यांचे संरक्षण करणे, पाणी गरजेपुरतेच वापरणे अशा विविध प्रकारे प्रत्येकाने नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन, संवर्धन केले पाहिजे.
• यासाठीच महाराष्ट्र शासन विविध अभयारण्य स्थापन करून प्राण्यांचे संवर्धन करीत आहे. अमरावती जिल्ह्यात मेळघाट व्याघ्र प्रकल्प, सोलापूर येथे माळढोक पक्षी अभयारण्य, कोल्हापूर येथे राधानगरी अभयारण्य तर धुळे येथे अनेरडॅम पक्षी अभयारण्य हे आहेत.
• पाणी, वारा यांच्यामुळे जमिनीवरील माती कमी होणे याला जमिनीची धूप असे म्हणतात. जमिनीची धूप रोखण्यासाठी वृक्षारोपण करणे, जमिनीचे लहान लहान सपाट भाग करणे, उताराच्या बाजूने पाणी अडवणारे आडवे बांध घालणे, असे उपाय करू शकतो कारण खडकांपासून मातीचा 2.5 सेंटीमीटर पातळ थर तयार होण्यासाठी सुमारे 800 ते 1000 वर्षांचा काळ लागू शकतो.
• नैसर्गिक साधन संपत्तीच्या संवर्धनासाठीचा एक भाग म्हणून महाराष्ट्र शासनाने राज्याच्या काही भागात दुष्काळावर मात करण्यासाठी 2014-15 पासून महाराष्ट्रातील 22 टंचाईग्रस्त जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेचा शुभारंभ केलेला असून 2019 पर्यंत संपूर्ण महाराष्ट्र टंचाईमुक्त करण्याचा निर्धार केलेला आहे. याअंतर्गत पावसाचे पाणी गावाच्या शिवारातच अडविणे, पाणीसाठवण क्षमता निर्माण करणारी नवीन कामे हाती घेणे, बंधारे, गाव तलाव, पाझर तलाव, इत्यादी जलस्रोतांची साठवण क्षमता वाढवणे अशी कामे सुरू आहेत.
• पदार्थ सूक्ष्म कणांचे बनलेले असतात. आपण जे पदार्थ पाहू शकतो, स्पर्श करू शकतो त्यांना द्रव्य म्हटले जाते.
• सर्व पदार्थ सूक्ष्मकणांचे बनलेले असतात. चराचर सृष्टीतील वस्तूंचे 7 गटांत वर्गीकरण होत असून पदार्थाच्या सूक्ष्मातीसूक्ष्म कणांना 'पीलव' असे नाव भारतातील प्राचीन तत्त्वज्ञ महर्षी कणाद यांनी दिले आहे. शेतातील धान्याचे कण वेचून त्यावर उदरनिर्वाह महर्षी करीत असल्यामुळे त्यांना 'कणाद' असे नाव पडले.
• त्यांचा जन्म इ.सन पूर्व सहाव्या शतकात प्रभास क्षेत्र म्हणजे सध्याच्या गुजरात राज्यातील सोरटी सोमनाथ जवळच्या प्रभासपट्टण येथे झाला असून त्यांचे मूळ नाव उलूक होते.
• कोणत्याही पदार्थामध्ये असणारा द्रव्यसंचय म्हणजे त्या पदार्थाचे वस्तुमान (Mass) असून ते कधीच बदलत नाही. ते सगळीकडे सारखेच असते तर एखाद्या वस्तूवर गुरुत्वाकर्षणाचा परिणाम होऊन येणारी राशी म्हणजे वजन (Weight At) होय.
.....…........…....………………………………
जीवनसत्त्व : ए
जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होणारे विकार : रातांधळेपणा
उपाययोजना :- आहारात पालेभाज्या, पिवळी पिकलेली फळे, गाजर, पपई, आणि दूध यांचा समावेश
जीवनसत्त्व : बी
जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होणारे विकार : जीभ लाल होणे, त्वचा खरखरीत होणे
उपाययोजना :- आहारात डाळी, पालेभाज्या दूध यांचा समावेश
जीवनसत्त्व : सी
जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होणारे विकार : हिरड्यांतून रक्त येणे
उपाययोजना :- आहारात आवळा, लिंबू, संत्रे, मोड आलेले कडधान्ये यांचा समावेश
जीवनसत्त्व : डी
जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होणारे विकार : पायाची हाडे वाकणे, पाठीला बाक येणे
उपाययोजना :- कोवळ्या सूर्यप्रकाशात बसणे, दूध, शार्कलिव्हर ऑइल आणि कॉडलिव्हर ऑइल यांचा आहारात समावेश.
0 Comments