वातावरणाचे थर (Structure of Atmosphere)


1) तपांबर (Troposhere)-

हा वातावरणाचा सर्वात खालचा थर असून याचे क्षेत्र 0 ते 13 किमी पृथ्वीपृष्ठापासून वरच्या दिशेला आहे.

• यामध्ये जसजसे उंच जावे तसतसे तापमान कमी कमी होत जाते.

दर 160 मीटर उंचीवर 1° से. तापमान कमी होत जाते तर दर 32 मीटर पृथ्वीच्या गाभ्याकडे गेल्यास 1° से.

ने तापमान वाढत जाते.

• तापस्तब्धी (Tropopause)

तपांबरातच 11 ते 13 किमी उंचीवर 3 किमी हा थर असतो. या भागात

तापमान स्थिर असते. ढग, पाऊस, धुके, वादळ, वारे इ. येथे तयार होतात.

• तपांबर आणि स्थितांबर यांना अलग करणारा हा थर असतो.

• वाहतुकीसाठी वापरली जाणारी विमाने तपांबराच्या उंचावरच्या भागात उडवली जातात.

2) स्थितांबर (Stratosphere)-

• या थराचा विस्तार 13 ते 50 किमी दरम्यान असून हा थर तपांबराच्या लगेच वरच्या दिशेला असतो,

• याच भागात ओझोनचा थर असतो.

3) मध्यांबर (Mesosphere)-

• याचा विस्तार 50 ते 80 कि.मी.असून या थरात इतरांपेक्षा तापमान सर्वात कमी असते.

4) आयनांबर (lonosphere)-

• मध्यांबराच्या वर 80 ते 500 किमी दरम्यान हा थर असतो.

• वातावरणाच्या या थरात आयन किंवा विद्युतलहरी तयार होतात म्हणून संदेशवहनासाठी रेडिओ लहरींचे परावर्तन करण्यासाठी याचा वापर होत असतो.

5) बाह्यांबर (Exosphere)-

• पृथ्वीपृष्ठापासून 500 किमीच्या वरच्या थराला बाह्यांबर असे म्हणतात.

• या थरात तापमान उंचीनुसार वाढत जाते.

• येथे हायड्रोजन सारखे वायू आढळतात, या थराच्या वरच्या भागात चुंबकीय मंडल आढळते.

• वातावरणामुळे पृथ्वीचे तापमान नियंत्रित राहण्यास मदत होते.