• पृथ्वीवरील विविधता अभ्यासणे हा भूगोलाचा मुख्य उद्देश असतो.
• विश्वामधील असंख्य तारकामंडळांपैकी आपले तारकामंडळ 'आकाशगंगा' (Milky way) या नावाने ओळखले जाते.
• Geo म्हणजे पृथ्वी, Graphy म्हणजे वर्णन. Geography म्हणजे 'पृथ्वीचे वर्णन' होय.
• ज्याला स्वतःचा प्रकाश असतो त्याला तारा म्हणतात. सूर्य हा आपल्या सूर्यकुलाचा तारा आहे.
• ताऱ्याभोवती फिरणाऱ्या परप्रकाशित खगोलाला 'ग्रह' म्हणतात. आपण ज्या खगोलावर राहतो. ती पृथ्वी ही देखील एक ग्रहच आहे.
• पृथ्वीचे एकूण क्षेत्रफळ 51 कोटी चौ.किमी.असून यापैकी
1) जलभाग 36.1 कोटी चौ.किमी.आह.
(71%) 2) भूभाग 14.9 कोटी चौ.किमी.आहे. (29%)
• पृथ्वीचा विषुववृत्तीय व्यास 12756 किमी आहे. • पृथ्वीचा ध्रुवीय व्यास 12714 किमी आहे.
- विषुववृत्तीय व्यास आणि ध्रुवीय व्यासामधील फरक 42 किलोमीटर एवढा आहे.
• पृथ्वी स्वतःभोवती फिरत असल्यामुळे ती विषुववृत्तीय भागामध्ये फुगीर झाली आहे.
• पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणाचे स्थान निश्चितपणे सांगण्यासाठी ज्या आडव्या आणि उभ्या काल्पनिक रेषांचा वापर केला जातो, या रेषांना अनुक्रमे 'अक्षवृत्ते' आणि 'रेखावृत्ते' असे म्हणतात.
॥ अक्षवृत्त (Parellel of Latitude)
• पृथ्वीच्या पृष्ठभागावरील आडव्या गोलाकार काल्पनिक रेषा म्हणजे अक्षवृत्त होय.
• पृथ्वीला दोन भागांमध्ये विभागणाऱ्या सर्वात मोठ्या अक्षवृत्तास विषुववृत्त (Equator) असे म्हणतात.
• विषुववृत्त हे शून्य अक्षवृत्त मानले जाते. विषुववृत्तच्या उत्तरेला 90 आणि दक्षिणेला 90 अशी एकूण 180 अक्षवृत्ते आहेत.
2) रेखावृत्त (Meridian of Longitude)
• पृथ्वी पृष्ठभागावरील एखाद्या ठिकाणचे स्थान निश्चित करण्यासाठी ज्या उभ्या अर्धवर्तुळ काल्पनिक रेखा उत्तर ध्रुव ते दक्षिणध्रुव या दिशेने असतात. त्यांना 'रेखावृत्त' असे म्हणतात.
• रेखावृत्ते ही पूर्व गोलार्धात 180 आणि पश्चिम गोलार्धात 180 अशी 360 आहेत.
• इंग्लंडमधील ग्रिनीच शहरावरुन जाणारे रेखावृत्त मूळ रेखावृत्त मानतात. रेखावृत्ताचे किंवा पश्चिम रेखावृत्त असेच करतात याचे कारण म्हणजे ग्रिनीच मधील मूळ रेखावृत्ताच्या पश्चिमेला 180 आणि पूर्वेला 180 असे 360 रेखावृत्ते आहेत म्हणून रेखावृत्तांची दिशा पूर्व किंवा पश्चिमच असू शकते.
0 Comments