भारताचा भूगोल 

• भारत हा दक्षिण आशियातील एक प्रमुख देश असून भारताने लोकशाही गणराज्य प्रणालीचा स्वीकार केला आहे.
• क्षेत्रफळाने जगातील सातव्या क्रमांकाचा देश असून भारताचे एकूण क्षेत्रफळ 32,87,263 चौरस किमी आहे जे जगाच्या 2.46% आहे.
• लोकसंख्येच्या दृष्टीने भारताचा जगात दुसरा क्रमांक लागत असून देशाची लोकसंख्या 2011 नुसार 121.02 कोटी आहे ज्याचे जागतिक प्रमाण 17.5 टक्के एवढे होते. भारताच्या भूभागाचा विचार करता लोकसंख्या 7 पटीपेक्षाही जास्त असल्याचे दिसते.
• देशात प्रशासनाच्या सोयीसाठी 29 घटक राज्ये आणि 7 केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती करण्यात आली असून यापैकी क्षेत्रफळाच्या दृष्टीने राजस्थान हे राज्य प्रथम क्रमांकावर असून, मध्यप्रदेशचा दुसरा क्रमांक लागतो तर महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागतो.
• देशातील सर्वात लहान राज्य गोवा असून ते भारताचे 25 वे राज्य आहे. त्यानंतर निर्माण झालेले छत्तीसगड (1 नोव्हेंबर 2000), उत्तराखंड (9 नोव्हेंबर 2000) आणि झारखंड (15 नोव्हेंबर 2000) अनुक्रमे 26,27 आणि 28 वे राज्य ठरले.
• सर्वात शेवटी निर्माण झालेले तेलंगना राज्य 2 जून 2014 रोजी अस्तित्वात आले. आंध्रप्रदेश आणि तेलंगणाची पुढील 10 वर्षासाठी हैद्राबाद ही संयुक्त राजधानी राहणार असून आंध्रप्रदेशसाठी अमरावती हे शहर राजधानीचे शहर म्हणून बांधण्यात येत आहे. याचे बांधकाम सिंगापूरच्या धर्तीवर करण्यात येत आहे.

स्थान आणि विस्तार 

• भारताचे स्थान उत्तर आणि पूर्व गोलार्धात असून आशिया खंडाच्या दक्षिण भागात वसलेले एक प्रमुख देश आहे.
• भारताच्या मध्यभागातून कर्कवृत्त जात असून गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगढ़, झारखंड, पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि मिझोराम या 8 राज्यामधून जाते.
• भारताचा अक्षवृत्तीय विस्तार 8°4'28'' उत्तर ते 37°6'53" उत्तर एवढा असून भारताचे दक्षिण टोक 6°45' उत्तर अक्षवृत्तावरील इंदिरा पॉईंट या नावाने ओळखले जाते.
• भारताचा अक्षवृत्तीय विस्तार 29°2'25'' एवढा मोठा असल्यामुळे या विस्ताराचा प्रभाव पर्जन्यमान, तापमान आणि दिवसरात्रीच्या कालावधीवर पडतो. यामुळेच कन्याकुमारी जवळ सर्वात मोठा दिवस व सर्वात लहान दिवस यांच्यातील फरक सुमारे 45 मिनिटांचा असून हाच फरक लेह आणि लडाखच्या प्रदेशात सुमारे 4 तासाचा आहे.


• भारताचा रेखावृत्तीय विस्तार 68°7'33'' ते 97°24'47" पूर्व एवढा असून अक्षवृत्तीय विस्ताराप्रमाणेच जवळपास 2917°14' असा रेखावृत्तीय विस्तार आहे.
• रेखावृत्तीय विस्ताराचा परिणाम स्थानिक वेळ, सूर्योदय आणि सूर्यास्त यावर पडत असल्यामुळे अरुणाचल प्रदेशातील किबिथू गाव आणि गुजरातमधील घुअरमोटा यांच्यादरम्यान सूर्योदयातील फरक 116 मिनिटे म्हणजे 2 तासांचा आहे.
• अलाहाबाद शहरातून जाणारे 82°30' पूर्व रेखावृत्त भारतातील प्रमाण रेखावृत्त मानले जात असून ग्रिनीच शहराच्या 5 तास 30 मिनिटे येथील वेळ पुढे आहे.
• भारताच्या पश्चिमेला अरबी समुद्र असून पूर्वेला बंगालचा उपसागर आहे आणि दक्षिणेला हिंदी महासागर आहे.
• भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यान मनारचे आखात आणि पाल्कची सामुद्रधुनी आहे. अरबी समुद्र, हिंदी महासागर आणि बंगालचा उपसागर हे कन्याकुमारी येथे एकत्र येतात.
• भारत देशाच्या आजूबाजूला काही देश असून त्यांची सीमा भारताला लागते.
•  चीन, बांग्लादेश आणि नेपाळची सीमा भारतातील प्रत्येकी 5 राज्यांना लागते तर पाकिस्तान, भुतान आणि म्यानमार या देशाची सीमा प्रत्येकी 4 राज्यांना लागते.
• जम्मू काश्मीर, पश्चिम बंगाल, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश या प्रत्येक राज्यांची सीमा 3 देशांना लागत असून उत्तराखंड, आसाम आणि मिझोराम या राज्यांची सीमा प्रत्येकी 2 देशांना लागते.