उत्क्रांती
• 'उत्क्रांती' म्हणजे सतत आणि संथ वेगाने होणारा बदल असून उत्क्रांतीची संकल्पना सुस्पष्ट स्वरूपात पहिल्यांदा चार्ल्स डार्विन या शास्त्रज्ञाने मांडली.
1) चार्ल्स रॉबर्ट डार्विन हा ब्रिटिश जीवनशास्त्रज्ञ असून त्याने 1859 मध्ये “प्राण्यांच्या प्रजातींचा उगम याविषयी" (On the origin of Species) या ग्रंथात उत्क्रांतीची संकल्पना मांडली.
2) डॉर्विनने त्याच्या दुसऱ्या पुस्तकात म्हणजे 'मानवाचे अवतरण' (The Desent of Man) या पुस्तकात इस 1871 मध्ये त्याने वानरांपासून मानव उत्क्रांत झाला या अनुमानाला मान्यता दिली.
• ज्या प्रजाती बदलत्या पर्यावरणाशी जुळवून घेण्यास सक्षम असतात त्या टिकून राहतात आणि ज्या प्रजाती टिकून राहू शकत नाही त्या उत्क्रांतीच्या प्रक्रियेत नष्ट होतात हा डार्विनचा जगप्रसिद्ध सिद्धांत आहे.
• एखादे अचानक आलेले निसर्गातील संकट किंवा पर्यावरणात झालेला आकस्मिक बदल हे डायनोसॉरच्या महाकाय प्रजाती नष्ट होण्याचे कारण असावे, असे मानले जाते.
0 Comments