माहीत आहे का तुम्हाला? #22

* डोडो हा एक निसर्गाच्या साखळीतून अस्तंगत झालेला पक्षी आहे.

* जनुकीय अभियांत्रिकी मधील क्लोनिंग तंत्रज्ञानाने जन्माला घातलेला डॉली मेंढी हा पहिला सस्तन प्राणी आहे.

*कोळशाचे रुपांतर वायू अवस्थेमध्ये रूपांतरण करून त्याचा अतिशय कार्यक्षम व स्वच्छ इंधन म्हणून वापर करता येतो.

* युरेनियम डेटिंग ही पद्धत अतिशय पुरातन खडकांच्या वयाच्या मोजमापासाठी वापरतात.

* ऊसापासून साखर करताना उसाच्या एकूण वजनाच्या १०% रुपांतर होऊ शकते.

* मलेरिया उपचारासाठी क्यूनिन हे औषध सिंकोना या वनस्पतीपासून मिळतात.

* वातावरण नसल्याने प्रकाशाचे विकिरण होत नाही म्हणून अंतराळवीरांना आकाश काळे दिसते.

* कीटकांच्या आक्रमणाला प्रभावीपणे तोंड देणारी बिटी कॉटन ही जनुकीय बदल केलेली कापसाची जात आहे.

* एड्स हा सार्वदेशिक रोग आहे.

*शरीराच्या वजनाच्या १८% वजन हाडांचे असते.

*कवटीच्या हाडांची संख्या २२ असते. त्यात चेहऱ्याची १४ व cranium किंवा ब्रेन बॉक्स ची आठ हाडे यांचा समावेश होतो.

* उखळीचा सांधा (ball and socket joint) ची हालचाल सर्व दिशांनी होऊ शकते.