माहीत आहे का तुम्हाला? #19

* 1955 मध्ये बी जी खेर यांच्या अध्यक्षतेखाली राजभाषा आयोगाची स्थापना करण्यात आली होती.

*कौटुंबिक न्यायालयांची स्थापना कौटुंबिक न्यायालय अधिनियम १९८४ नुसार केले जाते.

* संयुक्त बैठक राष्ट्रपती बोलवतात, कलम १०८ नुसार संयुक्त बैठक बोलवली जाते.

*केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सेवाशर्ती व कार्यकाळ राष्ट्रपतींमार्फत ठरविला जातो.

*९१ व्या घटनादुरुस्तीनुसार पक्षांतर बंदी कायद्यामध्ये दोषी ठरलेला व्यक्ती मंत्रिपदासाठी अपात्र असतो.

* एम हिदायतुल्ला हे भारताचे मुख्य न्यायाधीश होते, ज्यांनी काही काळ प्रभारी राष्ट्रपती पदाची जबाबदारी सांभाळली.

* महाराष्ट्रातील ग्रामपंचायत सदस्याच्या अपात्रतेमुळे एखादी जागा रिक्त झाली आहे किंवा नाही असा प्रश्न उद्भवल्यास त्याबाबत विभागीय आयुक्तांचा आदेश अंतिम असतो.