*महापौर पदाचा कार्यकाळ अडीच वर्षे असतो
*लोकायुक्त ही संस्था स्थापन करणारे पहिले राज्य महाराष्ट्र असून या संस्थेसाठी कायदा करणारे पहिले राज्य ओडिशा आहे.
*छत्तीसगढ राज्याचे उच्च न्यायालय बिलासपूर येथे स्थित आहे. (स्थापना वर्ष: २०००)
*राष्ट्रीय ध्वज समितीचे अध्यक्ष डॉ राजेंद्रप्रसाद हे होते.
*१९३४ मध्ये पाटणा येथे भरलेल्या काँग्रेस कार्यकारिणी बैठकीत संविधान सभेची मागणी सर्वप्रथम करण्यात आली.
*डेक्कन ओडिसी या रेल्वेची सुरुवात २००४ या वर्षी झाली.
*गड्डी ही मेंढीची जात आहे.
* बाळापूर किल्ला अकोला राज्यात आहे
*द्वितीय भुकंपलहरी द्रव पदार्थात उंच जात नाहीत.
*गरजणारे चाळीस हे वायव्य प्रतिव्यापारी वारे आहेत.
*महाराष्ट्रात अधोमुखी व उर्ध्वमुखी लवणस्तंभ कान्हूर येथे अहमदनगर जिल्ह्यात आढळतात.
*ओरिसा राज्यातील कोणार्क येथील सूर्यमंदिर जगप्रसिद्ध आहे, त्यास ब्लॅक पॅगोडा असे म्हणतात, तर पुरी येथील जगन्नाथ मंदिराला व्हाईट पॅगोडा असे देखील म्हणतात.
*ऍनी बेझंट यांनी १९९८ मध्ये वाराणसी येथे हिंदू कॉलेज ची स्थापना केली.
*पुण्याच्या सार्वजनिक सभेच्या धर्तीवर वऱ्हाड सार्वजनिक संस्था रंगनाथ नरसिंह मुधोळकर यांनी स्थापन केली होती, १८९० मध्ये इंग्लंडला सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ पाठविण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला, त्यात मुधोळकर व मोरोपंत जोशी हे दोन प्रमुख सदस्य होते.
*तिलारी विद्युत प्रकल्प सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे.
*१९०७ या वर्षी सुरत येथे दुभंगलेले काँग्रेसचे अधिवेशन हे तेविसावे अधिवेशन होते.
* भारतीय वन सेवा १९६६ या वर्षी अस्तित्वात आली.
* नॅशनल पीपल्स पार्टी ला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा भेटला, ह्या पक्षाची स्थापना २०१३ साली झाली, पी. ए संगमा यांनी या पक्षाची स्थापना केली होती.
(निवडणूक चिन्ह: पुस्तक.)
संकलन: Truptesh Bhadane
0 Comments