* माहित आहे का तुम्हाला? #23

* संसदेचे अधिवेशन सुरू झाल्यापासून ६ आठवड्याच्या आत अध्यादेशाला मान्यता न मिळाल्यास तो अध्यादेश संपुष्टात येतो.

* अन्य देशांच्या भारतातील राजनैतिक अधिकाऱ्यांच्या राष्ट्रपतींची मान्यता आवश्यक होती.

* सरकारिया आयोगाच्या शिफारशीने आंतरराज्य परिषदेची स्थापना करण्यात आली.

* नियोजन आयोगाद्वारे दारिद्र्यरेषा ठरविण्यासाठी सर्वप्रथम वाय. के. अलघ यांच्या अध्यक्षतेखाली कृती दलाची नेमणूक करण्यात आली होती.

** १. भारतातील पहिले वृत्तपत्र काढण्याचा मान जेम्स ओगस्टस हिकी याला प्राप्त झाला.
२. त्याने १९८० मध्ये The bengal gazette (the Calcutta general adviser ) या नावाने वृत्तपत्र प्रकाशित केले.
३. उद्देश्य : i. कंपनीच्या कर्मचाऱ्यांमध्ये असलेला भ्रष्टाचार व त्यांची दुष्कृत्ये चव्हाट्यावर आणणे
ii. पण या वृत्तपत्रात सरकारी अधिकारी , मुख्य न्यायाधीश व गव्हर्नर जनरल यांच्यावर टीका करण्यात आल्याने १८८२ मध्ये त्याचा कारखाना जप्त करण्यात आला.

* भारतीय भाषेतून प्रकाशित होणारे पहिले वृत्तपत्र : समाचार दर्पण
१. हे बातिष्ट मिशनरी सोसायटी यांच्याकडून प्रकाशित केले जात होते.
ठिकाण: श्रीरामपूर
भाषा: बंगाली
वर्ष: १८१८
२. बातिष्ट मिशनरी सोसायटीने सुरुवातीला १८१८ दिग्दर्शन हे मासिक सुरू केले होते.
३.या मासिकाच्या प्रचंड प्रतिसादानंतर समाचार दर्पण हे वृत्तपत्र १८१८ मध्ये सुरू करण्यात आले.

* १८८२ पर्यंत देशात एकूण ७२ महाविद्यालये स्थापन झाली होती.
१. देशातील पहिले कॉलेज : संस्कृत कॉलेज
२. ठिकाण: बनारस
३. वर्ष: १७९१
४. जोनानाथ डंकन यांनी स्थापन केले
५. उद्देश्य: हिंदू कायदा व तत्वज्ञानाचा अभ्यास करणे.
६. १८१३ च्या चार्टर ॲक्ट नुसार कंपनीने शिक्षणावर दरवर्षी १ लाख रुपये खर्च करावा अशी तरतूद.

* शेती व्यवसायाच्या व्यापारीकरणामुळे ब्रिटिशांच्या काळात सरकार विरोधात उठाव झाले कारण:
१. ब्रिटिश काळात निळ, चहा, तंबाखू इत्यादींच्या लागवडीसाठी ब्रिटिश नागरिकांना मोफत जमिनी देण्यात आल्या.
२. कृषी व उद्योगाअंतर्गत पारस्पारिक सहकार्य नष्ट करण्यात आले.
३. व्यापारी शेतीचे फायदे मध्यस्थांना झाले, मात्र शेतकरी वंचित राहिले.