माहीत आहे का तुम्हाला? #24

* रॉयल कमिशन ने आपला शेतीवरील अहवाल १९२८ वर्षामध्ये सादर केला.

* १९ व्या शतकामध्ये संपूर्ण भारतात ठिकठिकाणी आदिवासींचे बंड झाले, कारण : ब्रिटिशांचे वसाहतवादी धोरण.

* भारतामध्ये दत्तक वारस नामंजूर करण्याचे धोरण लॉर्ड डलहौसी ने राबवले.
१. लॉर्ड डलहौसी:(१८४८ - १८५६) भारतामध्ये दत्तक वारस नामंजूर करून सातारा, जैतपुर, संबळपूर, भगत, उदयपूर, झाशी, नागपूर, इत्यादी संस्थाने खालसा केली.
२. लॉर्ड हेस्टिंग ( १८१३-१८२३) : *पिंडाऱ्यांचे दमण
*तिसरे मराठा इंग्रज युद्ध.
३. विल्यम बेटिंग:
* पहिला गव्हर्नर जनरल
* सती बंदी कायदा (१८२८ - १८३५)
*अर्भकहत्या व बालक बळींवर बंदी
* ठगांचा बंदोबस्त (१८२९-३०)
४. लॉर्ड कॅनिंग: (१८५८-१८६२)
*भारताचा पहिला व्हॉइसरॉय
*१८५७- कलकत्ता, मद्रास व बॉम्बे येथे विद्यापीठे स्थापन केली.
*७ एप्रिल १८६० रोजी भारताचा पहिला अर्थसंकल्प मांडला गेला.
*१८६२- कागदी चलन लागू केले.

*१८५७ च्या उठावातील महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी सहभागी झालेले नेते:
कोल्हापूर : रामजी शिरसाठ
खानदेश : भीमा नाईक, काजी सिंग
मुंबई: गुलमार डूबे
नाशिक : भगवंतराव निळकंठराव
सातारा: रंगो बापूजी