कृषीविषयक माहिती #3
*हवेतील नत्र स्थिर करणाऱ्या जिवाणू खतांपैकी अझोला ही एक पान वनस्पती आहे, ही पाणवनस्पती अनाबेना अझोली या शैवालाबरोबर सहजीवी पद्धतीने वाढते.
* कडधान्ये, फळझाडे व भाजीपाला यांच्या मुळांवर गाठी करणाऱ्या सूत्रकृमींच्या नियंत्रणासाठी पॅसिलोमायसिस लिलयासिनस हा जीवाणू उपयुक्त ठरतो.
* पिठ्या ढेकूण या किडीच्या नियंत्रणासाठी क्रिप्टोलिमस मॉन्ट्रोझायरी ( भुंगेरे ) हा जैव घटक परिणामकारक ठरतो.
* भारतीय वनस्पतीजनुक शास्त्रज्ञ डॉ. सुरिंदर वसल व मेक्सिको येथील डॉ. विलिगास यांना सन २००० चे सहस्त्रक जागतिक अन्न पारितोषिक प्रदान केले गेले होते, त्यांनी प्रथिनांची समृध्द मक्याची पौष्टिक जात विकसित केली आहे.
* ऊस तोडल्यानंतर तेथे नवीन लागण न करता तोच ऊस पुन्हा वाढविणे यास खोडवा असे म्हणतात.
* गूळ तयार करण्यासाठी उसाच्या को ७२१९ (संजीवनी ) को. एम ७१२५ (संपदा) को. ८६०३२ (निरा) व को ८०१४ (महालक्ष्मी) या जाती योग्य समजल्या जातात.
* फास्ट फूड च्या जमान्यात भारतातील डूरूम प्रकारच्या गव्हास मध्य पूर्व व दक्षिण आफ्रिकेत चांगली मागणी आहे.
*सेंद्रिय संयुगे फक्त निसर्गतःच तयार होतात अशी एकोणिसाव्या शतकापर्यंत वैज्ञानिक जगताची समजूत होती. इ.स. 1928 मध्ये फ्रेडरिक व्होलर यांनी कृत्रिमरित्या युरिया तयार करून या समजुतीला धक्का दिला. व्होलर यांचा हा शोध कृषिजगताच्या दृष्टीने क्रांतिकारक ठरला आहे.
* युरिया या खतात नत्राचे प्रमाण सर्वाधिक म्हणजे ४६% इतके असते, तर म्युरेट ऑफ पोटॅश या खतात पालाश चे प्रमाण सर्वाधिक म्हणजे ५८% असते.
*इ. स. १९५९ मध्ये स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था (Maharashtra Engineering Research Institute MERI) मुख्यालय नाशिक येथे आहे.
*भारतातील वेगवेगळ्या राज्यांतील वेगवेगळ्या आदिम जाती स्थलांतरित स्वरूपाची शेती करतात. एका ठिकाणच्या जमिनीची उत्पादन क्षमता कमी झाली, की ती जमीन पडीक सोडून इतरत्र सकस शेत जमिनीवर शेती करायची हे त्यामागील तत्व.
* अनेक पिकांचा विध्वंस करणाऱ्या मावा व तुडतुडे यांचा समाचार घेण्यासाठी क्रायसोपरला कारनी हे जिवाणू प्रभावी ठरतात.
0 Comments