कृषीविषयक माहिती #4


* चीलोनस ब्लकबर्नी, ट्रायकोग्रामा चीलोनिस व ट्रायकोग्रामा जॅपोनिकम हे जैविक घटक किंवा जिवाणू भातावरील खोडकिडीचा नायनाट करण्यासाठी प्रभावी ठरले आहेत.

*कीटकांच्या लिंग प्रलोभन रसायनास फेरोमोन्स अशी संज्ञा आहे.

* परोपजीवी अथवा परभक्षी किटकांचा वापर करून कीड नियंत्रण करण्याच्या पद्धतीस जैविक कीटक नियंत्रण पद्धती असे म्हणतात.

* पतंगवर्गीय अळ्यांचा नाश करण्यासाठी bacillus thuregenesis या जीवाणूंचा तर पतंगाच्या नियंत्रणासाठी फेरोमोन्स सापळा वापरण्यात येतो.

* बोर्डोमिश्रण हे बुरशीनाशक ताम्रयुक्त प्रकारचे आहे.

* बोर्डोमिश्रण या बुरशीनाशकातील महत्त्वाचे घटक म्हणजे मोरचूद व चुना.

* मुख्यत्वे भात या पिकावर पडणारा करपा रोगाच्या नियंत्रणासाठी ताम्रयुक्त बुरशीनाशक वापरतात.

*एस एल एन पी व्ही हा मॅजिक नावाने ओळखला जाणारा विषाणू किंवा जैविक घटक सोयाबीन बटाटा व अन्य पिकांचा नाश करणाऱ्या स्पोडोटेरा तथा पाने खाणाऱ्या अळ्यांच्या नियंत्रणासाठी उपयुक्त आहे.

* गंधक या अन्नद्रव्याच्या कमकरतेमुळे कोवळ्या पानांचा हिरवा रंग कमी कमी होत जाऊन पाने पूर्ण पिवळी पडतात .

* तांबे या अन्नद्रव्याच्या झाडाच्या शेंड्याची वाढ खुंटते व झाडांना डायबॅक नावाचा रोग होतो.

* जमिनीतील कॅल्शियमचा अधिक निचरा होऊन त्याची जागा हायड्रोजनने घेतली गेल्यामुळे आल्मधर्मीय जमीन तयार होते.

*क्षारयुक्त जमिनीचे वर्गीकरण सोडियमच्या अस्तित्व प्रमाणावरून करतात.

* निळ्या-हिरव्या शेवाळातील हॅट्रोसिस्ट ही विशिष्ट प्रकारची पेशी वातावरणातील नत्र स्थिर करण्याचे कार्य करते.