माहीत आहे का तुम्हाला? #5
* ज्या तापमानास हवा बाष्पाने संपृप्त होते, त्या तापमानास दवबिंदू म्हणतात.

*रंगआंधळेपणा झाल्यामुळे लाल व हिरवा रंग ओळखण्यास अडचण निर्माण होते.

* जर एखादा पुरुष रंगआंधळा असेल तर त्याच्या मुलीच्या मुलाला रंगआंधळेपणा होवू शकतो.

*हिपॅटायटीस सी व ई रोगासाठी लस उपलब्ध नाही.

*हिपॅटायटीस बी म्हणजे पांढरी कावीळ होय.

*हिपॅटायटीस बी, सी, डी, हे रक्तमार्फत किंवा लैंगिक प्रजननाद्वारे होतात, व हिपॅटायटीस A व E हे पाणी आणि अन्नामार्फत होतात.

*हृदयाचा एक ठोका ०.८ सेकंदात होतो.

*प्रौढ व्यक्तीत एका मिनिटात ७२ हृदयाचे ठोके होतात.

*यू डी कोलान वापरल्याने आपणास हायसे वाटते,कारण बाष्पीभवनाने गारवा मिळतो.

*अणुच्या केंद्रांचे एकत्रीकरण करून सूर्याची ऊर्जा निर्माण होते.

*सूर्याच्या पृष्ठभागावर हायड्रोजन अणुचे हेलियम मध्ये रुपांतर होत असते, केंद्रीय संमिलनाद्वारे अणुच्या केंद्रांचे एकत्रीकरण होते.

*फॉस्फरसची समस्थनिके: २, याच्या समस्थानिकांचा उपयोग ब्लड कॅन्सर वरील उपचारासाठी होत असतो.

*ऑक्सीजनची समस्थानिके: ३

*अणुच्या तिसऱ्या कक्षेत जास्तीत जास्त १८ इलेक्ट्रॉन असू शकतात.

* पूर्ण अष्टक असलेले मूलद्रव्य: Ne

*वातानुकूलित यंत्रात प्रशितक म्हणून फ्रिओन वापरतात.

*भोपाळ वायू दुर्घटना (१९८४) ही युनियन कार्बाईड ह्या कंपनीत घडली, ही कंपनी अमेरिकेची होती, व वॉरेन अँडरसन हे ह्या कंपनीचे सीईओ होते. या कंपनीतून मिथील आयसोसायनेट हा वायू बाहेर पडला होता.

संकलन: Truptesh Bhadane.