माहीत आहे का तुम्हाला? #26

* Central drug reasearch institute लखनौ येथे आहे.

* भारतात ब्रह्मपुत्रा नदीला रेड रिव्हर ऑफ इंडिया असे देखील म्हटले जाते.

* रायलसीमा हा प्रदेश आंध्रप्रदेश राज्याशी संबंधित आहे.

* दुकम पोर्ट ओमान देशात आहे.

* सबांग पोर्ट इंडोनेशिया देशात आहे.

* अंदाजपत्रक सादर करणे ही जबाबदारी आर्थिक घडामोडी विभागाची आहे.

*क्रांतिसिंह नाना पाटील १९६७ मध्ये बीड लोकसभा मतदार संघातून लोकसभेवर निवडून गेले होते.

* महाराष्ट्र रोजगार हमी परिषदेचा अध्यक्ष मुख्यमंत्री असतो.

* संसदेत मराठीतून भाषण करणारे पहिले खासदार : क्रांतिसिंह नाना पाटील.

* आठवणीचे पक्षी ही कादंबरी सोनकांबळे यांची आहे.

* कुष्ठरोगावर गुणकारी औषध शोधल्यामुळे भाऊ दाजी लाड यांना धन्वंतरी म्हटले जाते.

* मार्गदर्शक तत्वे शासनाकडून केलेल्या अपेक्षा आहेत तर मूलभूत कर्तव्य जनतेच्या अपेक्षा आहेत.

* ४४ व्या घटनादुरुस्तीने मूलभूत अधिकारांच्या यादीतून संपत्तीचा अधिकार काढून टाकण्यात आला.

* ख्रिस्ती मिशनऱ्यांनी सुरू केलेल्या धर्मांतर प्रक्रियेविरुध्द सर्वप्रथम विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी आवाज उठवला.