पंचायत समिती
• पंचायत समिती ही पंचायत राजच्या त्रिस्तरीय रचनेमधील तालुका स्तरावरील रचना आहे. महाराष्ट्रात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी 'पंचायत समिती' असते.
• पंचायत समिती ही जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत यांच्यामधील दुवा आहे. 'जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम-1961' नुसार पंचायत समितीची स्थापना करण्यात आली आहे. तालुक्यातील सर्व गावांचा विकास गट असतो. या गटाचा कारभार 'पंचायत समिती' पाहते.
रचना -
• पंचायत समितीच्या गटास 'गण' असे म्हणतात. विकास गटातील मतदार पंचायत समितीच्या सभासदांची निवड प्रौढ व गुप्त मतदान पद्धतीने करतात.
• एकूण जागापैकी 50% जागा महिलांसाठी राखीव असतात. तर इतर मागास वर्गीयांसाठी 27% जागा राखीव
असतात. इतर जाती-जमातींच्या प्रमाणावर सदस्याचे प्रमाण अवलंबून असते.
कार्यकाल व पात्रता
• पंचायत समितीच्या निवडणूक दर 5 वर्षांनी होतात तर पंचायत समितीच्या सदस्याचा कार्यकाल सुद्धा 5 वर्षांचा असतो.
• निवडणूक लढवणारा उमेदवार खालील अटी पूर्ण करणारा असावा.
1) भारताचा नागरिक असावा.
2) त्याचे किमान वय 21 वर्षे पूर्ण असायला पाहिजे.
3) उमेदवाराचे नाव स्थानिक मतदार यादीत असायला पाहिजे.
सभापती व उपसभापती
• पंचायत समितीत निवडून आलेले सदस्य आपल्यापैकी एकाची सभापती तर एकाची उपसभापती म्हणून निवड करतात.
• यांचा कार्यकाल अडीच वर्षांचा असतो.
• सभापती त्यांचा राजीनामा जिल्हा परिषद अध्यक्षांकडे देतात तर उपसभापती त्यांचा राजीनामा सभापतींना पाठवू शकतात. सभापती पद आरक्षणाप्रमाणे बदलत जाते.
• अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग आणि महिला यांप्रमाणे सभापतीपद राखून ठेवले जाते.
• पंचायत समितीची बैठक सभापतींच्या अध्यक्षतेखाली चालते.
• सभापतींच्या अनुपस्थितीत उपसभापती पंचायत समितीचे कामकाज पाहतात.
• पंचायत समितीच्या 1/4 सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वास ठराव मांडल्यास सात दिवसांच्या आत विशेष बैठक होऊन तो ठराव जर 2/3 बहुमताने मंजूर झाल्यास सभापती व उपसभापतींना राजीनामा द्यावा लागतो.
पंचायत समितीचे प्रशासन -
• पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख गटविकास अधिकारी' (BDO- Block development Officer
असतो. त्यांची निवड महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत होत असते, तर नेमणूक राज्यशासन करते.
• गटविकास अधिकारी पंचायत समितीचा सचिव म्हणून कार्य करतो. दररोजच्या कामकाजाचा अहवाल तया
करणे, पंचायत समितीचे अंदाजपत्रक तयार करणे इ. कामे त्यांना करावी लागतात.
पंचायत समितीचे प्रशासन 7 विभागात विभागलेले असते. यामध्ये...
1.Administration Department - प्रशासन विभाग
2 Finance Department - वित्त विभाग
3 Public Works Department - सार्वजनिक बांधकाम विभाग
4 Agriculture Department - शेती विभाग
5 Health Department - आरोग्य विभाग
6 Education Department - शिक्षण विभाग
7 Social Welfare Department - समाजकल्याण विभाग
या प्रत्येक विभागासाठी एक अधिकारी असतो आणि हे सर्व विभाग गट विकास अधिकाऱ्यांच्या निदर्शनाखाली
काम करतात.
पंचायत समितीची कामे
1. शेतीविषयक सुधारणांच्या योजनांची अंमलबजावणी करणे.
2. सार्वजनिक
आरोग्याच्या सोई करणे.
3. पाझर तलवांच्या
कामांना गती देणे.
4. प्राथमिक शिक्षणाच्या
सोई करणे.
5. जलसिंचनाच्या सोई
उपलब्ध करून देणे.
7. गावागावांना जोडणाऱ्या रस्त्यांची दुरुस्ती करणे.
8 हस्तोद्योग व कुटीरोद्योगांना प्रोत्साहन देणे.
9. समाज कल्याणाच्या
विविध योजना राबवणे.
उत्पन्नाची साधने
• पंचायत समितीला उत्पन्नाची स्वतंत्र साधने नसतात.
• जिल्हा परिषद जिल्हा निधीतून काही रक्कम पंचायत समितीला देते तर राज्यशासन जिल्हा परिषदेमार्फत
काही प्रमाणात जमीन महसूल देत असते.
0 Comments