सुएझ कालवा

*सुएझ कालवा इजिप्त या देशात आहे

* हा कालवा तांबडा समुद्र व भुमध्य समुद्र जोडतो.

*हा कालवा १९३.३ किलोमीटर (१२०.१ मैल) लांबीचा असून त्याचे बांधकाम इ.स. १८६९ साली पूर्ण करण्यात आले.

*सुएझ कालवा प्राधिकरण या संस्थेकडे कालव्याची मालकी व देखभालीची जबाबदारी आहे. ही संस्था इजिप्त सरकारने १९५६ मध्ये स्थापन केली.

*जून 1967 साली, इजिप्त, सीरिया आणि जॉर्डनचं इस्रायलसोबत युद्ध सुरू झालं होतं आणि दोन्ही बाजूंच्या गोळीबारामध्ये सुएझ कालव्यात 15 व्यापारी जहाजं अडकली होती.

*२३ मार्च २०२१ या दिवशी या कालव्यात तैवानी कंपनीच्या evergreen कंपनीच्या 400 मीटर लांब आणि 60 मीटर रुंद 'एव्हर गिव्हन' जहाज अडकले, व वाहतूक ठप्प झाली, एक आठवड्याच्या प्रयत्नानंतर अखेर ते जहाज काढून मार्ग मोकळा करण्यात यश आले.


संकलन: Truptesh Bhadane.