माहीत आहे का तुम्हाला?#9

* लीला रे या एकमेव महिला सदस्य होत्या ज्यांनी भारताच्या विभाजनामुळे व्यथित होऊन घटना समितीच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. (त्या बंगालमधून घटनासमिती मध्ये निवडून आल्या होत्या.)

*संघ लोकसेवा आयोग (upsc) चे अध्यक्ष व सदस्य यांच्या सेवाशर्ती ठरविण्याचा अधिकार घटनेने राष्ट्रपतीला दिला आहे.

*वामनराव खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने मूलभूत संरचना तत्व (basic structure) पुन्हा उचलून धरले, व स्पष्ट केले की २४ एप्रिल १९७३ नंतरच्या सर्व घटना दुरुस्त्यांना हे लागू होईल.

* एच डी देवेगौडा हे कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री होते.

*मोरारजी देसाई हे मुंबई राज्याचे मुख्यमंत्री होते.

*भारताचे माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग हे उत्तर प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री देखील होते.

संकलन: Truptesh Bhadane