माहीत आहे का तुम्हाला? #8

* आंत्रपुच्छ (appendix) काढुन टाकण्याची पहिली यशस्वी शस्त्रक्रिया डॉ. विल्यम डब्ल्यू. ग्रांट यांनी मेरी गार्टसाईड या रुग्णावर केली.

* रेटीनॉल हे ए या जीवनसत्त्वाचे रासायनिक नाव आहे.

*लिटमस कागद लायकेन या वनस्पतीपासून मिळवितात.

* मानवी डोळ्यांचा इरीस हा भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो.

* जिवाणूंमधील प्रजननाची सर्वात प्रभावी पद्धती द्वीविखंडण आहे.

*पित्त यकृतात तयार होते.

*टेंडॉन हे स्नायू व हाडास जोडते.

*धोतऱ्याचे परागकण गोलाकार असतात.

*बेनोमिल चा उपयोग फळांसाठी बुरशी रोधक म्हणून करतात.

* १९४८ साली, zea maize (मका) मधून प्रथमच ट्रांस्योझॉनस शोधून काढण्याचे श्रेय मकक्लीन्टॉक यांना जाते.

*बंचीटॉप हा रोग विशेषतः केळी या पिकात आढळतो.

*चेतापेशी मानवी शरीरातील सर्वात मोठी पेशी आहे.

* एका मिनिटात मूत्रपिंडातून १ लिटर रक्त वाहते.

संकलन: Truptesh Bhadane