माहीत आहे का तुम्हाला?#13

* ऍलन ऑक्टीव्हियन ह्यूम यांनी संरक्षण खात्यात काम केले नव्हते, त्यांनी गृह, जंगल, महसूल या सर्व खात्यांमध्ये चिटणीस म्हणून काम पाहिले होते.

* वैदर्भ हे पत्र १८७० मध्ये व्यंकटराव मुधोळकर यांनी वर्धा येथून सुरू केले होते.

* हातात थाळी घेऊन स्वतःच ती वाजवीत, व आपल्याच भाषणाची दवंडी पिटत, असे व्याख्यानाला लोक कमविण्याची विलक्षण पद्धती वासुदेव बळवंत फडके यांची होती.

* नव ज्ञान ग्रहण करण्यास मने तयार ठेवण्याची वृत्ती म्हणजे सत्यशोधकी वृत्ती असे विचार महात्मा फुले यांनी मांडले होते.

* इंग्रज या जगातच नसते, तर काही बिघडले नसते हे विधान विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी आमच्या देशाची स्थिती या निबंधात केली आहे. ते म्हणतात की पारतंत्र्य पासून होणारी सर्वात मोठी हानी ती ही की, त्यापासून मानसिक उन्नती अगदी नष्ट होऊन जाते..

* लोकमान्य टिळक यांचे केसरी हे सुरुवातीला दर मंगळवारी प्रसिद्ध होत असे.

* नानासाहेब पेशव्यांनी चांदीच्या मुठीची तलवार कोल्हापूरचे चीमासाहेब यांना नजर म्हणून पाठविली होती.

* जेम्स ब्राईट या मानववंश शास्त्रज्ञाने असे प्रतिपादित केले होते की, लांडगा, कोल्हा व कुत्रा यांच्यामध्ये जसे मूलभूत फरक आहेत तसेच, पाश्चिमात्त्य गोरे, आफ्रिकन निग्रो व पूर्व आशियातील पीत वर्णीय वंशात आहेत.