• देशातील काही प्रमुख नद्या


1) गंगा नदी-

• उत्तराखंडच्या पश्चिम भागातील गंगोत्री येथून उगम.

• भारतातील सर्वात लांब नदी असून हिचे खोरे सर्वात मोठे आहे.

• यमुना ही गंगेची प्रमुख उपनदी असून तिचा उगम 'यमुनोत्री' येथून होतो.

• सुंदरबन हा जगातील सर्वात मोठा त्रिभूज प्रदेश याच नदीच्या क्षेत्रात येतो.


2) ब्रह्मपुत्रा नदी-

• तिबेटमधील मानसरोवर येथे या नदीचा उगम होतो.

•अरुणाचल प्रदेशात या नदीला “दिहांग' नावाने ओळखले जाते तर आसाममधून वाहताना 'ब्रह्मपुत्रा' म्हणतात,

• आसाममध्ये माजुली हे नदीपात्रातील जगातील सर्वात मोठे बेट आहे. 2016 मध्ये याच बेटाला जिल्ह्याचा दर्जा मिळाला.

• सुबनसिरी, मनास व तिस्ता या प्रमुख उपनद्या असून त्या पुरांसाठी प्रसिद्ध आहेत.


3) सिंधू नदी

• कैलास पर्वताच्या उत्तर उतारावर तिबेट मानसरोवर येथून उगम होतो.

• ही नदी जम्मू व काश्मिरमधून वाहते, त्यानंतर पंजाबमधून सिंधू नदीच्या उपनद्या वाहत तिला येऊन मिळतात. त्यानंतर ही नदी पाकिस्तानातून वाहत अरबी समुद्राला जाऊन मिळते.


प्रमुख उपनद्या-


1) श्योक, गिलगीट - या नद्या उत्तर काश्मिरातून वाहतात.


2) झेलम, चिनाब - या सतलजच्या उपनद्या आहेत.


3) रावी, बियास, सतलज -

हिमाचल प्रदेश व पंजाबमधून वाहतात.


4) नर्मदा नदी - या नदीचा उगम मध्य प्रदेशातील अमरकंटक येथून होतो.

• ही सर्वाधिक लांबीची (1312 किमी) पश्चिमवाहिनी नदी आहे.

• याच नदीवर जबलपूरजवळ धुंवाधार धबधबा आहे.


5) तापी नदी -

• मध्य प्रदेशातील मुलताई येथून या नदीचा उगम होतो. या नदीची 724 किमी लांबी असून ही सुद्धा पश्चिमवाहिनीच आहे.

• दक्षिणेकडे वाहत जाणाऱ्या साबरमती, मही व लुनी या प्रमुख नद्या आहेत.


6) महानदी

• छत्तीसगडमधील बस्तर डोंगर रांगांमध्ये ह्या नदीचा उगम होतो.

• ही नदी प्रथम उत्तरेकडे वाहून नंतर पूर्वेकडे वाहत जाते.

• या नदीची लांबी 858 किमी असून हिचे खोरे बशीच्या आकारासारखे आहेत याला 'छत्तीसगड मैदान' असे म्हणतात.


7) गोदावरी नदी

• भारतीय पठारावरील सर्वात लांब नदी असून गंगा नदीनंतर दुसऱ्या क्रमाकांचे मोठे खोरे आहे. या नदीची एकूण लांबी 1465 किमी आहे.

• नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथून उगम होतो. महाराष्ट्र, तेलंगणा, छत्तीसगड, मध्यप्रदेश, कर्नाटक आणि ओरिसा असा प्रवास करुन बंगालच्या उपसागराला मिळते.

• महाराष्ट्रात 668 किमी वाहते आणि मांजरा, प्राणहिता, इंद्रावती या महाराष्ट्रातील काही प्रमुख उपनद्या होत.


8) कृष्णा नदी

• सह्याद्री पर्वतातील महाबळेश्वर (सातारा) येथून उगम, भीमा व तुंगभद्रा या प्रमुख उपनद्या आहेत. कृष्णेची एकूण लांबी 1400 किमी आहे.


9) कावेरी नदी

• ही दक्षिण भारतातील प्रमुख नदी असून लांबी 805 किमी आहे.

• हिचा उगम कर्नाटकातील ब्रह्मगिरी डोंगरात होतो.

• भवानी व अमरावती या प्रमुख उपनद्या आहेत.

• ऋतुनुसार बदलणारे वारे म्हणजे मान्सून वारे होत.

• उत्तर भारतात दिवसा उष्ण व कोरडे वारे येतात त्यांना 'लू' म्हटले जाते.